Last Updated: Sunday, March 17, 2013, 10:15
www.24taas.com,ऱत्नागिरी पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ४९व्या अधिवेशनात पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
रत्नागिरीत शनिवारी एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन भविण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कामगारांना आपण न्याय मिळवून देऊ, असे सांगत पवारांनी राज ठाकरेंना टार्गेट केलं. राज ठाकरे दुसरं दुकान थाटू नका, असे पवार म्हणालेत.
एसटी कामगार संघटना असताना मनसेचीही एसटीमध्ये दुसरी कामगार संघटना कार्यरत आहे. त्यामुळे मनसेचेही एसटी कर्मचारी आणि कामगारांमध्ये संख्याबळ वाढत आहे. मनसेच्या कामगार संघटनेला एसटी कामगार संघटनेचा विरोध आहे. हाच धागा पकडत पवार यांनी राज यांनी टार्गेट केलं.
आता एसटीमध्ये दुसरं दुकान थाटू नका, असा हल्ला राज यांच्यावर चढवलाय. मनसेला पहिलं दुकान असाच टोला पवारांना हाणलाय. त्यामुळे राज आता काय उत्तर देणार, याची उत्सुकता आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना पवारांनी बालिश म्हटले होते. त्यांच्या टीकेकडे काय लक्ष द्यायचे, असे पवार म्हणाले होते. मात्र, त्यांनी पुन्हा राज यांना टार्गेट केल्याने राज-पवार शाब्दीक सामना पाहायला मिळणार आहे.
First Published: Sunday, March 17, 2013, 10:09