राज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे, Sunil tatkare on Raj Thackeray

राज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे

राज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे
www.24taas.com, मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ सभांना गर्दी होते म्हणजे यशस्वी झालो, असं होत नसल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे.

अजित पवार आणि राज ठाकरेंमधील वाढत्या संघर्षावर बोलताना अजित पवारांचं नेतृत्व जनतेनं मान्य केलं आहे. या दोघांमध्ये तुलना योग्य नसल्याचंचं जणू तटकरेंनी सुचवलं आहे.

दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे हे वेगळ्या उंचीचे नेते होते, त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला महत्व होतं, असं सांगत तटकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे... तर दुसरीकडे राज ठाकरे यांची आज जालन्यात जाहीर सभा होते आहे. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीमधला रस्त्यावर आलेला संघर्ष यावर राज काय भाष्य करतात याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

First Published: Saturday, March 2, 2013, 18:45


comments powered by Disqus