Last Updated: Sunday, March 3, 2013, 10:05
www.24taas.com, जालनाराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत. असं म्हणत त्यांनी या पोरकट प्रश्नांची उत्तरं द्यावी असं आव्हान त्यांनी शरद पवारांना दिलं.
राज्यातला सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्हा असलेल्या जालन्यात झालेल्या सभेत राज यांनी दुष्काळापेक्षा पवार काका-पुतण्यांवरच्या टीकेलाच झुकतं माप दिलं. राष्ट्रवादीकडे चार महत्त्वाची खाती आहेत आणि त्याच खात्यांत भ्रष्टाचार सुरूय, असं राज म्हणाले. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या चार कंत्राटदारांची नावं वाचून ते अजितदादांचे निकटवर्तीय असल्याचा दावाही त्यांनी केला.
तहलकानं अजित पवारांच्या घोटाळ्यांवर काढलेला विशेषांक मराठीत अनुवादित करून वाटणार असल्याचंही राज यांनी यावेळी जाहीर केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही सवाल राज यांनी केलेत.
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना इतका पुळका आहे, तर मग एप्रिलमध्ये महाराष्ट्रात होणा-या आयपीएलच्या मॅचेस का नाही रद्द करत नाही असा खडा सवाल त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना केला.
First Published: Sunday, March 3, 2013, 00:14