सचिन तेंडुलकरची भूमिका अमिरला पडद्यावर साकारायचेय,Aamir Khan wants to play role of Sachin Tend

सचिन तेंडुलकरची भूमिका अमिरला पडद्यावर साकारायचेय

सचिन तेंडुलकरची भूमिका अमिरला पडद्यावर साकारायचेय
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेट जगतचा देव असणारा सचिन सर्वांचाच लाडका आहे. त्याच्या फॅनलिस्टमध्ये छोट्या दोस्तांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत अमूल्य योगदान देणारे महान कलाकार, नेते यांचाही सामावेश आहे. बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानही सचिनच्या चाहता आहे. त्याला मोठ्या पडद्यावर सचिनची भूमिका साकारायची आहे.

भविष्यात कधीही सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सिनेमा बनला, तर त्या सिनेमात सचिनची भूमिका करायची आहे, अशी इच्छा अमिरने व्यक्त केली आहे. जर चांगला सिनेमा मिळत असेल आणि त्याची पटकथा आवडली तर निश्चित मला हा सिनेमा करायला आवडेल. असं अमिरने सांगितलं. अमिर सचिनचा चाहता आहे आणि आजही अमिरने वानखेडेत सचिनची शेवटची कसोटी पाहण्यासाठी आपली उपस्थिती लावली आहे.

सलमान खान आणि कॅटरीना कैफला एकत्र पाहण्याची इच्छा अमिरने व्यक्त केली. जेव्हा अमिरला सलमानच्या लग्नाबाबत विचारलं गेलं असता अमिरने, ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए’ हे गाणं गायले. यावरच बाजूला उपस्थित असलेली कॅटरीनाही लाजली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 15, 2013, 13:00


comments powered by Disqus