सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर, nana patekar, sachin tendulkar

सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर

सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर
www.24taas.com, नागपूर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.

सचिनचे क्रिकेट करता योगदान आम्ही विसरू शकत नाही, पण सरकारी कर्मचा-यांप्रमाणे प्रत्येक खेळाडूच्या निवृत्तीची देखील एक वेळ असते, असं सांगत नानानं जणू सचिनला क्रिकेट पासून निवृत्तीचा सल्लाच दिलाय.

नागपुरात डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना नानानं ही प्रतिक्रिया दिली. देशभरातील क्रिकेट रसिकांमध्ये सचिनला प्रचंड आदराचे स्थान आहे. निवड समितीने त्याला काढून टाकणे, हे लोकांना आवडणार नाही. त्यामुळे त्याने स्वत:च सन्मानाने नवृत्ती घेणे योग्य राहील, असे नाना म्हणाला.
नाना पाटेकर म्हणाले, बाबा आमटे आणि प्रकाश आमटे यांचे कार्य महान आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना मी गेल्या ४० वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात भूमिका करताना एक नट म्हणून फार त्रास झाला नाही. चित्रीकरण आता संपत आले आहे. मात्र ते कधीच संपू नये, असे वाटत आहे.

First Published: Monday, December 17, 2012, 08:18


comments powered by Disqus