Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:33
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबई इंडियन्सच्य़ा टीमच्या सन्मानार्थ आज टीमचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पार्टी देण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टीमचे सारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यावेळी उपस्थित होता.
विशेष म्हणजे या पार्टीत सर्वच खेळाडूंनी सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी परिधान केली होती. मुंबई इंडियन्सनं रविवारी झालेल्या फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. आयपीएलच्या पाठोपाठ चॅम्पियन्स लीगचं विजेतेपद पटकावत मुंबई इंडियन्सनं अनोखा विक्रम केलाय. टीमच्या या यशाचं अंबानींच्या घरी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी टीमचं फोटेसेशनही पार पाडलं.
व्हिडिओ पाहा :- *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, October 8, 2013, 08:22