`क्रिकेटच्या देवा`च्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?, people unable to see god`s last match

सचिनच्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?

सचिनच्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टची उत्सुकता शिगेला पोहलचली आहे. मात्र, सचिनची शेवटची टेस्ट पाहण्याची संधी सामान्य क्रिकेटप्रेमींना कमीच मिळणार आहे. केवळ दोन ते अडीच अजार तिकीटचं सामान्य सचिन चाहत्यांना मिळणार आहे.

सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता क्रिकेटचा हा देव रिटायर होतोय. वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन आपल्या क्रिकेट करिअरमधील अखेरची मॅच खेळणार आहे. या मॅचमध्ये सचिनला शेवटची बॅटिंग करताना पाहण्याची संधी जगभरातील क्रिकेट फॅन्सना मिळणार आहे. सचिनच्या या मॅचसाठीचं तिकीट मिळावं यासाठी सामान्य चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र, या मॅचचं तिकीट सामान्य क्रिकेट फॅन्सपर्यंत पोहचणारच नाही. ज्यांनी क्रिकेटला आणि सचिनला देवाचा दर्जा दिला त्या क्रिकेटरसिकांनाच सचिनची मॅच पाहायला मिळणार नाही.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची आसनक्षमता ३२ हजार एवढी आहे. यामध्ये सहा हजार तिकीटं ही एमसीएशी संलग्न असणाऱ्या क्लब्सना मिळणार आहेत. तर पाच जिमखान्यांना सहा हजार तिकीटं देण्यात आली आहेत. गरवारे क्लबलाही सहा हजार तिकीटं दिली आहेत. जवळपास दोन हजार तिकीटं ही बीसीसीआयसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. १०५ तिकीटं ही माजी रणजी प्लेअर्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी आहे तर ५०० हून अधिक तिकीटं सचिनला देण्यात आली आहेत. यामुळेच सामान्य क्रिकेटप्रेमींना केवळ दोन ते अडीच हजारचं तिकीटं मिळाली आहेत.

सामान्य क्रिकेट चाहत्यांनीही सचिनची मॅच स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार नसल्यामुळे नाराजीचा सूर आवळला आहे. सचिन तेंडुलकरची मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हेवीवेट्स पॉलिटिशन्स, सेलिब्रिटीज, क्रिकेट असोसिएशनची सलग्न क्लब, लाईफ मेंबबर्स आणि स़्पॉन्सर्स उपस्थित असतील. आणि सामन्य क्रिकेटप्रेमींना मात्र, सचिनची अखेरची मॅच ही टीव्हीवरच पाहून समाधान मानावं लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, October 28, 2013, 19:23


comments powered by Disqus