Last Updated: Thursday, April 25, 2013, 21:26
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसचिनच्या वाढदिवसानिमित्त भारताचे माजी कॅप्टन कपिल देवने सचिन तेंडुलकरच्या पहिल्या दौ-याच्या आठवणींना उजाळा दिला.
1990 मध्ये सचिन प्रथमच इंग्लंड दौ-यावर आला होता तेव्हा तो दहावीत होता आणि त्या दौ-यावर त्याने अभ्यासाठी पुस्तक आणली होती असं कपिल देव यांनी सांगितल. त्यावेळी सचिन हा खूप लाजाळू होता आणि तो कोणाशीही फारसा बोलत नसे.
तो कोणत्याही विषयावर स्वत:हून बोलत नसे असही कपिल देव यांनी सांगितले.
असाही सचिन
वाढदिवसानिमित्त सचिनने समाजासाठी काहीतरी काम करण्याचा संकल्प जाहीर केलाय. विदर्भातील वीज नसलेल्या खेड्यांतील कुटुंबांना सौर ऊर्जा देण्याचा संकल्प सचिनने जाहीर केलाय. खासदार निधीचा योग्य वापर कसा करायचा याचा विचार माझ्या मनात घोळत असतो. येत्या काही दिवसांत मी विदर्भातील शेतक-यांसाठीही काम करणार आहे. तसेच ज्या गावात वीज नाही तिथे सोलर लँप देणार आहे.
First Published: Thursday, April 25, 2013, 21:02