Last Updated: Tuesday, November 19, 2013, 11:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर निवृत्त झाला. त्याला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यानंतर सचिनने सर्वांचे आभार मानले. तर पुरस्कार मिळाल्यानंतर देशातील सर्व मातांचे आभार मानून त्यांच्यासाठी पुरस्कार समर्पित केला. याच सचिनने खास पार्टी आयोजित केली. या पार्टीत कोण कोण आलेत? बॉलिवूड स्टारपासून ते राजकारण्यांपासून अनेक दिग्गजांनी आवर्जुन उपस्थिती लावली.
सचिन तेंडुलकरनं रिटायर्ड झाल्यानंतर सोमवारी अंधेरीच्या वॉटरस्टोन हॉटेलमध्ये शानदार पार्टी दिली. या पार्टीला अनेक मान्यवर उपस्थित होते. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंसह अमिताभ बच्चन, जया बच्चन, मुकेश अंबानी, सुब्रतो रॉय, राज ठाकरे, शरद पवार, अमिर खान, ब्रायन लारा, आशा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, November 19, 2013, 10:00