Last Updated: Tuesday, November 19, 2013, 10:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली. या पार्टीला क्रिकेट विश्व, बॉलिवूड आणि राजकारणातले अनेक दिग्गज हजर होते. मात्र या पार्टीत नव्हता तो सचिनचा बालमित्र... सचिननं त्याला आमंत्रणच दिलं नव्हतं... हा मित्र म्हणजे विनोद कांबळी...
विनोद कांबळी सचिनच्या पार्टीत का नाही, हा चर्चेचा विषय बनला होता. सचिननं कांबळीला पार्टीत बोलावलच नसल्याचीही चर्चा होती.
पार्टीला वेस्टइंडिजचे माजी क्रिकेटर ब्रायन लारा यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. शिवाय अमिताभ बच्चन, आमिर खान, किरण राव, अरशद वारसी, सोनू निगम सारखे बॉलिवूडमधले दिग्गज. तर शरद पवार, राज ठाकरेंसारखे नेतेही पार्टीला हजर होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 19, 2013, 10:50