संजय दत्तची 'रेकॉर्ड'ब्रेक पोलिसगिरी..., Sanjay Dutt creates new record

संजय दत्तची 'रेकॉर्ड'ब्रेक पोलिसगिरी...

संजय दत्तची 'रेकॉर्ड'ब्रेक पोलिसगिरी...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदेशीररित्या हत्यारं बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा संजयला सुनावली गेलीय. पण, यामुळे त्याच्या कामात भलताच परिणाम दिसून येतोय. घेतलेली कामं पूर्ण करण्यासाठी संजय दिवस-रात्र एक करतोय.

संजय दत्त याच्या आगामी ‘पोलिसगिरी’ या सिनेमाचं डबिंग अवघ्या तीन तासांत पूर्ण करून संजयनं एक नवीन रेकॉर्ड केलाय. संजयच्या या कमिटमेंटबद्दल बोलताना, निर्माता राहुल अग्रवाल यानं संजयचं तोंडभरून कौतुक केलंय. ‘संजूनं जे केलंय ते कदाचितच कुणा दुसऱ्याला जमू शकेल. त्यानं संपूर्ण चित्रपटाचं डबिंग केवळ तीन तासांत पूर्ण केलंय. एव्हढंच नाही तर आपलं कामं बरोबर झालंय की नाही हे पाहण्यासाठी तो दुसऱ्या दिवशीही पुन्हा स्टुडिओमध्ये आला. हॅटस् ऑफ टू संजू’.

संजयला १८ एप्रिल रोजी पोलिसांसमोर हजर व्हायचं होतं. पण, सुप्रीम कोर्टात अर्ज केल्यानंतर त्याला त्याचं काम पूर्ण करण्यासाठी आणखी अवधी मिळालाय.

संजयचा आणखी एक आगामी चित्रपट ‘जंजीर’मध्ये शेर खानची भूमिका निभावतोय. जंजीर हा जुन्या ‘जंजीर’चा रिमेक आहे. जुन्या जंजीरमध्ये हीच भूमिका अभिनेते प्राण यांनी निभावली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 13:59


comments powered by Disqus