Last Updated: Friday, May 10, 2013, 15:19
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीसंजय दत्तची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळं संजय दत्तची जेलवारी पक्की झाली आहे. त्याला येत्या १५ मे ला जेलमध्ये जावेच लागणार आहे. जेलमध्ये त्याला साडेतीन वर्षांची शिक्षा भोगायची आहे. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनवली आहे. यावर संजय दत्तनं दाखल केलेल्या फेरविचार याचिका आज फेटाळ्यात आली.
अटक झाल्यानंतरही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्तने अनेक प्रयत्न केले होते. मात्र त्याच्यासमोरील सर्व मार्ग आता संपलेले आहेत. त्यामुळे संजय दत्तल आता कोर्टात जावेच लागणार आहे. संजय दत्तची ही याचिका फेटाळल्याने सिनेमा निर्मात्यांना मात्र चांगलाच धक्का बसणार आहे. कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो.
संजय दत्तला लवकरच जेलमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे आता सिनेनिर्मात्यासमोर संकट निर्माण झाले आहे. संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 10, 2013, 15:17