Last Updated: Friday, May 10, 2013, 14:55
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनवली आहे. यावर संजय दत्तनं दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अटक झाल्यानंतरही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्तसमोर कोणते मार्ग असतील यासाठी देखील संजय दत्त प्रयत्नशील असणार आहे.
संजयच्या आगामी सिनेमांवरही कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो...त्यामुळे या फिल्मच्या निर्मात्यांचंही या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. संजय दत्तला सुनावलेल्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरच आज सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टानं संजय दत्तला ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कमी करण्यासाठी संजय दत्तकडून प्रयत्न केले जाणार आहेत. संजय दत्तसाठी शिक्षा कमी करण्याचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 10, 2013, 11:35