Last Updated: Tuesday, August 14, 2012, 13:56
www.24taas.com, मुंबईझी टीव्हीवर सुपरहिट असणाऱ्या डान्स इंडिया डान्स या प्रोग्राममधील फैजल खान याने डीआयडी लिटिल चॅम्प्स ट्रोफीवर आपलं नाव कोरलं. शेवटपर्यंत पोहोचलेल्या टॉप-५ प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रिंस की पलटणमध्ये असणाऱ्या फैजलने विजय संपादन केला.
फैजल खान एक चांगला डान्सर असून आपल्या जबरदस्त डान्सच्या बळावरच त्याने हा किताब मिळवला. मुंबई ऑडिशनमध्ये फैजलची निवड झाली होती. ऑडिशनमधल्या फैजलच्या परफॉर्मंसने प्रभावित होऊन मास्टर गीत कपूरने आपला मुलगाही फैजलसारखा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.
फैजलचे वडिल मुंबईत रिक्षाचालक आहेत. घरची परिस्थिती बिकट असूनही त्यांनी फैजलच्या नृत्याच्या आवडीला प्रोत्साहन दिलं. डीआयडीमध्ये सहभाग घेण्यासाठीही वडिलांनीच फैजलला प्रोत्साहन दिलं होतं. फैजलचा डान्स पहिल्या एपिसोडपासूनच सर्वांना आवडला होता. कार्यक्रमाला वेळोवेळी उपस्थित असणाऱ्या सेलिब्रिटींनीही फैजलचं कौतुक केलं होतं.
First Published: Tuesday, August 14, 2012, 13:56