`बालिकावधू`... कजाकिस्तानात ठरली सुपरस्टार!, BALIKAVADHU - SUPERSTAR IN KAZAKISTAN

`बालिकावधू`... कजाकिस्तानात ठरली सुपरस्टार!

`बालिकावधू`... कजाकिस्तानात ठरली सुपरस्टार!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

`बालिकावधू` या डेली सोपमधून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलेली अविका गौर कजाकिस्तान या मध्य आशियाई देशात भलतीच फेमस झालीय. इथं अविकाला `सुपरस्टार` म्हणून ओळखलं जातं.

नुकतंच, अविका गौर हिला कजाकिस्तानात बोलावण्यात आलं होतं... इथं प्रेक्षकांनी तिच्या कामाला दिलेली दाद आणि फॅन्सचं प्रेम पाहून अविका भारावून गेली होती.

बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यानंतर अविका दुसरी अशी व्यक्ती आहे, जिची फॅन फॉलोइंग इतकी जबरदस्त आहे... असं म्हटलं जातंय.

कजाकिस्तानात आत्ता अविका हिनं अभिनय केलेल्या `बालिकावधू` या कार्यक्रमाच्या भागांचं प्रसारण सुरू आहे. अविकाची वाढती लोकप्रियता पाहून तिथल्या स्थानिक ब्रॉडकास्टर्स अविकाच्या `ससुराल सिमर का` या दुसऱ्या डेली सोपचे अधिकार विकत घेण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अविकानं रोलीची भूमिका निभावलीय.

आपल्या कजाकिस्तान ट्रीपबद्दल अविका म्हणजे, आनंदीनं प्रेक्षकांच्या मनात किती खोलवर स्थान प्राप्त केलंय, हे मला तिथं जाऊन समजलं. तिथं लोकांना भेटून मला खूप चांगलं वाटलं.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 11:18


comments powered by Disqus