Last Updated: Saturday, September 22, 2012, 14:38
www.24taas.com, नवी दिल्ली बिग बॉस या रियालिटी शोमध्ये प्रत्येक वेळेस प्रत्येक सीझनमध्ये अनेक वादग्रस्त व्यक्तींचा सहभाग असतो. गेल्याच सीझनमध्ये पॉर्न स्टार सनी लियॉनचा समावेश करण्यात आला होता. यावेळेस बिग बॉस ६ या रिऍलिटी शोमध्ये स्वामी अग्निवेशनंतर आता सेक्स स्कँडलमध्ये फसलेले स्वामी नित्यानंद दिसणार आहेत.
स्वामी नित्यानंद यांच्यावर दक्षिणेकडील अभिनेत्री रंजिता हिने बलात्काराचा आरोप केल्यावर या नित्यानंद स्वामींच्या रासलीला प्रसिद्धीस आल्या.एवढेच नव्हे तर या रंगील्या स्वामींच्या रासलीला त्यांच्या अनेक शिष्यांनीही उघड केल्या होत्या.
स्वामींनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्या महिला शिष्यांनी केला होता. बिग बॉसमध्ये नेहमीच वादग्रस्त व्यक्तींना सामील केले जाते आणि त्यात आता नित्यानंद स्वामींचा समावेश झाला आहे.
First Published: Saturday, September 22, 2012, 14:27