Last Updated: Thursday, March 14, 2013, 10:45
www.24taas.com, मुंबईबिग बॉसचा विजेता आशुतोष कौशिक यांनं मुंबईत दारुच्या नशेत हंगामा घातला. रेड एन्ट कॅफेमध्ये एका पार्टीत गेस्ट म्हणून सहभागी झालेल्या आशुतोष यान चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळं संतापलेल्या काही जणांनी आशुतोष आणि त्याच्या मित्राला चोप दिला. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी आशुतोषनं स्वत: सांगितल्या.
आशुतोष कौशिक आणि त्याच्या मित्राने दारू पिऊन चांगलाच राडा केला त्यामुळे तेथील लोकांनी त्या दोघांनाही चांगलाच प्रसाद दिला, लाथा-बुक्क्यांनी त्यांना अक्षरश: तुडविण्यात आलं. आणि यात जवळजवळ प्रत्येकानेच सहभाग घेतला होता.
आशुतोष एका पार्टीत सहभागी झाला होता. आशुतोष कौशीक बिग बॉसचा सीजन -२चा विजेता आहे. रेण्ड एट कॅफेमध्ये पार्टी सुरू असताना दारूचे सेवन जास्त केल्याने आशुतोषला आपण काय करतो आहोत याचेही भान नव्हते. त्यामुळेच त्याने प्रचंड गोंधळ घातला. परिणामी तेथील लोकांनी त्याला आणि त्याच्या मित्राला चांगलाच चोप दिला.
First Published: Thursday, March 14, 2013, 10:45