बिग बॉस-७: गोहर आणि कुशालच्या Love मध्ये `व्हिलन` कोण?, ‘Bigg Boss 7’: Ajaz tries to create differen

बिग बॉस-७: गोहर आणि कुशालच्या Love मध्ये `व्हिलन` कोण?

बिग बॉस-७: गोहर आणि कुशालच्या Love मध्ये `व्हिलन` कोण?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये गोहर खान आणि कुशाल टंडन यांच्यात प्रेम प्रसंग खुलेआम सुरू आहे. पण हा प्रेमाचा मामला एका व्यक्तीला पसंत नाही, तो या दोघांच्या प्रेमात व्हिलनचं काम करत आहे तो आहे इजाज.... इजाजला गोहर आणि कुशालचं प्रेम मनात सलतंय....

गोहरला कुशालने शोमध्ये प्रपोज केले तेव्हा ही गोष्ट इजाजला पसंत पडली नाही. कुशाल घरामधून बाहेर गेल्यावर इजाजने गोहरसोबत जवळीकता वाढवली होती. पण त्यावेळी आणि आताही गोहर इजाजला भाव देत नाही.

आता इजाज आपल्या व्हिलनगिरीच्या कामाला जोमाने लागला आहे. तो गोहर आणि कुशालमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कालच्या एपिसोडमध्ये इजाज एक गाणे गात होता. त्या गाण्यात गोहरला सांगितले की, काय मी एक गुपीत उघड करू... गोहरने अनेकदा विचारलं काय पण त्याने हसून ही गोष्ट टाळली. कुशाल पण या दरम्यान हसत होता.
त्याच्या वागणुकीवर असे दिसत होते की तो कुशाल आणि गोहरच्या ‘लव वायर’ला आग लावण्याचा प्रयत्न करीत होता.

इजाज घरात लावालावी करण्याचे काम करीत आहे. तशीच प्रतिमा त्याची घरात बनली आहे. गोहरला भटकविण्याचा तो नेहमी प्रयत्न करतो. पण गोहर त्याला घास टाकत नाही. गोहर आणि कुशाल एकमेकांशी खूप प्रेम करतात पण शो संपल्यावरही हे प्रेम कायम राहते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 6, 2013, 12:49


comments powered by Disqus