बिग बॉस ७ : अपूर्व अग्निहोत्री झाला घराबाहेर,Bigg Boss 7: Apurva Agnihotri gets evicted from the hou

बिग बॉस ७ : अपूर्व अग्निहोत्री झाला घराबाहेर

बिग बॉस ७ : अपूर्व अग्निहोत्री झाला घराबाहेर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मधून या शनिवारी अपूर्व अग्निहोत्री आउट झाला. अपूर्वचे बिग बॉसच्या घरात सर्वांशीच चांगले पटत होते. टीव्ही अॅक्टर कुशल टंडनशी त्याची खास मैत्री जमली होती.

अपूर्वने त्याच्या पत्नी शिल्पा अग्निहोत्रीसह या घरात प्रवेश घेतला होता. काही काळापूर्वीचं शिल्पा घरातून आउट झाली होती. घरात प्रवेश केल्यानंतर शिल्पाला आणि अपूर्वाला घरातील दोन भागात विभागलं होतं. नंतर ते एकत्रही आले.

घरात अनेकदा अस्थिर परिस्थिती निर्माण झाली तरी अपूर्वने शांत राहून, परिस्थिती सावरली. खरं तर अपूर्व घरातील मतभेदांदरम्यान इतरांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असे. घरातील एका टास्क दरम्यान अपूर्वाला आपले केस (मोहॉक) विशिष्ट पद्धतीने कापावे लागले होते. हे पाहून शिल्पाचा राग अनावर झाला. या हेअर कटमुळे अपूर्व घरात तर झळकलाच आणि या सर्व ड्रामाबाजीमुळे शो ला ही टिआरपी प्राप्त झाली होती.

‘जस्सी जैसी कोई नही’ या सिरीयलमुळे अपुर्व गाजला होता. यापूर्वी त्याने अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं होतं. आता ‘बिग बॉस ७’ च्या घरात गौहर खान, तनिषा मुखर्जी , अरमान कोहील, संग्राम सिंह, एली अवराम, प्रत्युशा बॅनर्जी, कामया पंजाबी, वी जे अॅन्डी यांचा सामावेश आहे, तसेच वाइल्ड कार्ड द्वारा कँडी बरार, एजाज खान आणि सोफिया हयात यांनी घरात प्रवेश केला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 18:26


comments powered by Disqus