अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर

Last Updated: Monday, June 9, 2014, 13:38

काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.

उद्या सकाळी 10 वाजता मेट्रो धावणार, पाहा अशी आहे मुंबई मेट्रो!

Last Updated: Saturday, June 7, 2014, 13:26

मुंबई मेट्रोच्या सीईओंनी जाहीर केल्यानंतर आता उद्या सकाळी 10 वाजता मुंबई मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. मेट्रोचं भाडं कमीतकमी 10 रुपये तर जास्तीत जास्त 40 रुपये असेल, असंही सांगण्यात येतंय.

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

Last Updated: Saturday, June 7, 2014, 13:00

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

म्हाडाचे ऑनलाईन अर्ज सहा मेपासून उपलब्ध

Last Updated: Saturday, April 26, 2014, 15:57

`म्हाडा`ची 2014 घरांची सोडत आता 15 जून रोजी होणार आहे. तर सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे.

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

Last Updated: Thursday, April 10, 2014, 19:33

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

`लाईव्ह फ्रॉम स्पेस`मध्ये पाहा संपूर्ण ब्रह्मांड!

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:57

प्रेक्षकांना घरबसल्या कोणत्याही ग्रहावर सूर्यास्त आणि सूर्योदय, शहरातला प्रकाश, ताऱ्यांचं जग, कडाडत्या वीजा, वादळ यांचे अद्भूत अशी दृश्यं पाहता येणं शक्य होणार आहे.

`मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या`

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 17:10

मुख्यमंत्री कोट्यातील घर वाटपासंदर्भात राज्य सरकानं दिलेली माहिती अपुर्ण आहे, असा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केला आहे. आधी दिलेल्या यादीत नेत्यांच्या नातलगांच्या नावे असलेल्या घरांबाबत राज्य सरकारने अपूर्ण माहिती दिली आहे.

पृथ्वीचा भाऊ सापडला, पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह सापडला

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 23:02

अंतराळात पृथ्वीसारखा दुसरा ग्रह नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र, याला आता अपवाद आहे, हे स्पष्ट झालं आहे. पृथ्वीपेक्षा आकारमानाने मोठा ग्रहाचा शोध लागला आहे. हा ग्रह पृथ्वीचा मोठा भाऊ असल्याचे सांगितले जात आहे.

शाळांची फी येत्या शैक्षणिक वर्षात वाढण्याची शक्यता

Last Updated: Friday, December 27, 2013, 12:09

शिक्षण हक्क कायद्यानुसार आता शाळांना वर्षाला १८० दिवसांऐवजी २२० दिवस करावे लागणार आहेत. त्यामुळं मात्र स्कूल बस असोसिएशन फी वाढवण्याच्या विचारात आहे. त्याचप्रमाणे शाळासुद्धा येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढवण्याच्या विचारात आहेत.

चैत्यभूमीवर लाखो आंबेडकर अनुयायी, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:07

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. देशासह महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकर अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. तर चैत्यभूमीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ५७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सचिन अहिर यांनी चैत्यभूमी आणि इंदू मिलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

पुण्यात एकाच कंपनीतील चौघं अचानक बेपत्ता

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 09:04

पुण्यामध्ये एकाच कंपनीतील चार कर्मचारी एकाचवेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. चांदणी चौकातील एका अॅड एजंसीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला असलेले चौघेही गेल्या १ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. हे सर्वजण २८ ते ३० वयोगटातील असून, त्यामध्ये एका तरूणीचाही समावेश आहे.

बिग बॉस ७ : अपूर्व अग्निहोत्री झाला घराबाहेर

Last Updated: Sunday, November 3, 2013, 18:30

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मधून या शनिवारी अपूर्व अग्निहोत्री आउट झाला. अपूर्वचे बिग बॉसच्या घरात सर्वांशीच चांगले पटत होते. टीव्ही अॅक्टर कुशल टंडनशी त्याची खास मैत्री जमली होती.

कमी नाही तर वाढले पेट्रोलचे दर!

Last Updated: Saturday, September 14, 2013, 09:06

पेट्रोलची किंमत कमी होणार अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, घडलंय उलटचं... पेट्रोलची किंमत कमी झाली नाहीच पण ती वाढलीय.... पेट्रोल पुन्हा एकदा १.६३ रुपयानं महागलंय.

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं- रामदेवबाबा

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:22

संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून दूर राहावं, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबांनी दिलाय. आई-मुलगी, सासू यांच्यासारख्या कुटुंबातल्या महिलांपासूनही दूर राहावं, असं रामदेवबाबा म्हणाले.

आता म्हाडाची घरंही द्या अधिकृतरित्या भाड्यानं!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 09:40

म्हाडाच्या नव्या निर्णयानं म्हाडाच्या घरात राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळालाय. म्हाडाची घरं आता भाड्यानं देता येणार आहेत. मात्र, त्यासाठी म्हाडाची पूर्वपरवानगी असणं आवश्यक असणार आहे.

फिक्सिंग : दोन फरार बुकी मुंबई क्राईम ब्रँचसमोर

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:37

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणातले दोन फरार बुकी संजय आणि पवन जयपूर आज मुंबई क्राईम ब्रँचसमोर हजर झालेत.

१८ वर्षांखालील गुन्हेगार हा `अल्पवयीन`च - SC

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 12:00

१८ वर्षाखालील गुन्हेगार हा `अल्पवयीन`च असेल हे आता अधोरेखित झाले आहे. बाल गुन्हेगार वयोमर्यादा १८ ऐवजी १६ वर्षांपर्यंत खाली आणण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी फेटाळली.

पोलिसांचा पगार एक्सिस बँकेतून लंपास

Last Updated: Friday, June 14, 2013, 20:03

बँकांच्या एटीएम मधून दुसर्या,च व्यक्तीनं पैसे काढून लंपास केल्याच्या घटना कधीतरी घडतात. मात्र ऍक्सिस बँकेच्या खात्यांमधून चक्क पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आयपीएलनं लावलाय कलंक

Last Updated: Thursday, May 16, 2013, 17:17

आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंगमुळे प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय. जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाला आयपीएलनं कलंक लावलाय. आयपीएलच्या या नौटंकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या सर्व क्रिकेटवेड्या प्रेक्षकांचा विश्वासघात झालाय.

अबब...आयपीएलमध्ये ४० हजार कोटींचं फिक्सिंग

Last Updated: Thursday, May 16, 2013, 16:06

आयपीएलमध्ये ४० हजार कोटीचं फिक्सिंग झाल्याचा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांनी केलाय. तर ५, ९ आणि १५ रोजीचे सामने फिक्स होते. एका ओव्हरमध्ये १४ रन्स देण्यासाठी ६० लाख रूपये फिक्सिंगमध्ये लावले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

आयपीएलचे दुबईतून फिक्सिंग?

Last Updated: Thursday, May 16, 2013, 14:25

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग थेट दुबईतून करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुंबई आणि दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने खेळाडूंना निलंबित केले आहे.

मुंबईतून होणार जुन्या टॅक्सी, रिक्षा बाद

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 19:27

२० वर्षांपेक्षा जुन्या टॅक्सी आणि १६ वर्षे जुन्या रिक्षा १ ऑगस्ट २०१३ पासून बाद करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणानं घेतलाय.

पीएफ आता ऑनलाईन ट्रान्सफर

Last Updated: Sunday, April 21, 2013, 15:13

तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.

वाघाचा हल्ला : कुटुंबियांना पाच लाखांची मदत

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 16:03

बिबटे किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

...आणि कोल्हापूरची चित्रनगरी पुन्हा उजळली!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 16:19

शासनाच्या पुढाकारानंतर या चित्रनगरीत पुन्हा एकदा लाईट, कॅमेरा, अॅक्शन असे शब्द कानावर पडू लागले आहेत.

ऑसी टीममध्ये बंड, चारी मुंड्या चीत

Last Updated: Monday, March 11, 2013, 19:53

मोहाली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसलाय. शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या चार क्रिकेटपटूंना टीम बाहेर ठेवण्यात आलंय. टीम प्रोटोकॉल मोडित काढल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

कुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 09:44

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

हेराफेरी नेटबँकिग, एक कोटी काढणारा अटकेत

Last Updated: Saturday, February 2, 2013, 23:52

अवघ्या ४५ मिनिटांत एका बँक खात्यातून एक कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय.ही हायप्रोफाईल हेराफेरी नेटबँकिगच्या मदतीने करण्यात आलीय. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून रक्कम ट्रांसफर केलेली खाती पोलिसांनी फ्रीज केलीत.

..तर १० शीर कापून आणा - सुषमा स्वराज

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 13:48

भाजप नेता सुषमा स्वराज यांनी सोमवारी म्हटलं की, जर पाकिस्तान शहीद हेमराज याचं शिर परत करणार नसेल तर भारताने पाकिस्तानची १० शिर कापून आणले पाहिजे.

आता `अटारी-वाघा बॉर्डर`वरच मिळू शकेल व्हिजा

Last Updated: Saturday, January 12, 2013, 08:07

भारत आणि पाकिस्तादच्या वरिष्ठ नागरिकांच्या सोईसाठी दोन्ही देशांमध्ये नवीन व्हिजा व्यवस्था सुरु करण्यात आलीय. आता दोन्ही देशांच्या वरिष्ठ नागरिकांना अटारी-वाघा संयुक्त चेक पोस्टवरूनच व्हिजा मिळू शकेल.

मुस्लिम मुलींना मोबाईल बंदी, पंचायतीचा फतवा

Last Updated: Friday, January 11, 2013, 10:32

राजस्थानमधील एका मुस्लिम समाजाच्या पंचायतीने आज (गुरुवार) मुलींच्या संरक्षणासाठी त्यांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली.

`कस्टम ड्युटी` भरून बापूंच्या आठवणी भारतात!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 08:05

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू मायदेशी आणण्यासाठी लाखो रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागलीय. अहिंसेचे पुजारी असलेल्या बापूंचं रक्त लागलेली माती, चष्मा, चरखा आणि इतर काही वस्तू काल भारतात आणण्यात आल्या.

'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!

Last Updated: Saturday, January 5, 2013, 16:20

अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेसाठी ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांना द्यावयाचे २१ कोटी रुपये केंद्रानं माफ केलेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केलीय.

बाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 09:30

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं.. विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली.

फेसबुकवरून `व्हॉटस् अप`चा मॅसेज?

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 08:23

गुगलपाठोपाठ आता फेसबुकही फ्रीमध्ये मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळेच फेसबुकनं व्हॉटस् अपला विकत घेण्याची तयारी दाखवलीय.

मुंबईतून दहा मुलींचे पलायन

Last Updated: Monday, December 3, 2012, 13:45

मुंबईतील मानखुर्दच्या महिला सुधारगृहातून दहा मुलींनी पलायन केलंय. सकाळी महिला सुधारगृहाच्या अधिका-यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय. त्यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

१८ पॅनकार्ड, ४८ फोन, ७५ डेबिट कार्ड आणि १३१ चेकबुक

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 19:26

सुमारे हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोपी आणि स्टॉक गुरू कंपनीचा मालक उल्हास खरेच्या विविध घरांवर छापे मारून महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे २० कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

आमिर म्हणतोय, `खान` मी वेगळा!

Last Updated: Saturday, November 24, 2012, 19:52

तिसरा खान मात्र या आपल्या दोन स्पर्धक ‘खान’ बरोबर अगदी आपल्या पद्धतीनं समीकरण बनवतो... आणि तो खान म्हणजे आमिर खान...

अंतराळातून सोन्याची बरसात!

Last Updated: Friday, November 23, 2012, 23:29

आजपर्यंत ज्या धुमकेतूंकडं विध्वंस म्हणून बघीतलं जातं होतं....त्या धुमकेतूमध्ये कुबेराचा खजिना दडला असल्याचं आता उघड झालंय...त्यामुळे माणसाचं नशिब बदलून जाणार आहे...

गेलचा कसोटीत पहिल्या बॉलवर विक्रमी सिक्सर

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 13:58

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलनं कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा विश्वविक्रम केला आहे. बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात ख्रिस गेलने ही किमया केली आहे.

जैतापूर प्रकल्पाचे काम फेब्रुवारीनंतर

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 19:19

कोकणातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकत्पाचे काम फेब्रुवारीनंतर सुरु होणार असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर के. सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. अणु ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु होण्यास आता कुठलाही अडथळा नसल्याचे ते म्हणाले.

ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 13:18

मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी एकाचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.

मॅथ्यू हेडनचा क्रिकेटला राम-राम

Last Updated: Friday, September 21, 2012, 10:11

ऑस्ट्रेलियाचा धुवाँधार सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन यानं गुरुवारी संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. तसंच तो ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी२०मध्येही सहभागी होणार नाही. तो ब्रिस्बेन हिट संघाकडून टी२० खेळत होता.

सुधारगृहातल्या बारबाला कुठे झाल्या गायब?

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 09:52

मुंबईत मानखुर्दमधल्या नवजीवन महिला सुधार गृहातून तब्बल १७ महिला एकाच वेळी गायब झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

आता पत्नीलाही पगार?

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:57

तमाम ‘हाऊसवाईफ’साठी एक खुशखबर आहे. आता प्रत्येक पतीला आपल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या पत्नीला देणं अनिवार्य होऊ शकतं.

पाकमधील हिंदू कुटुंबांची भारताकडे धाव...

Last Updated: Friday, August 17, 2012, 09:19

पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय.

रशियात पुराचा तडाखा, १५० जणांचा बळी

Last Updated: Sunday, July 8, 2012, 20:21

रशियात जोरदार पाऊस झाल्याने पुराने थैमान घातले. आतापर्यंत १५०लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. दक्षिण भागतील क्रेसनोडर भागात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळॆ अनेक जण वाहून गेलेत.या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

कामात रुग्णालयातून चोरीस गेलेलं बाळ सापडलं

Last Updated: Sunday, March 4, 2012, 09:43

मुंबईच्या कामा हॉस्पीटलमधून चार दिवसांपूर्वी चोरीस गेलेलं मुलं सापडलंय. टॅक्सीतून आलेल्या एका अनोळखी महिलेनं शनिवारी सकाळी मुंबईतल्या एका दर्ग्यासमोर या मुलाला गुपचूप ठेवून ही महिला पसार झाली. आता पोलीस या महिलेचा तसंच टॅक्सीचा शोध घेत आहेत.