`बिग बॉस`च्या घरात गौहर परत येण्याचं खरं कारण काय?, ‘Bigg Boss 7’: Here is why Gauahar Khan came back to the show

`बिग बॉस`च्या घरात गौहर परत येण्याचं खरं कारण काय?

`बिग बॉस`च्या घरात गौहर परत येण्याचं खरं कारण काय?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘बिग बॉस’च्या घरात रोज कुठला ना कुठला वाद होत असतो. काही दिवसांपूर्वी अँडीशी वाद झाल्यावर कुशालने अँडीच्या अंगावर हात उचलला आणि त्याला बिग बॉसने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याची साथीदार असणाऱ्या गौहरने त्यावेळी बाणेदारपणा दाखवत स्वतःहून कुशलसोबत घर सोडलं. पण, नंतर लगेच पुढच्या भागात गौहर घरी आली. यामागचं खरं कारण वेगळंच आहे.

गौहरच्या आंतर्वस्त्रांवरून अँडीने केलेली चेष्टा न रुचल्याने गौहर आणि अँडीमध्ये वाद झाला. गौहरचा चांगला मित्र असणाऱ्या कुशलने तर संतापून अँडीला मारहाणही केली. यावर बिग बॉसने अँडीला हाकललं. आपल्यामुळे हे सगळं झालं, असं म्हणत कुशलला पाठिंबा देत गौहरही बाहेर गेली.मात्र, दुसऱ्याच दिवशी गौहरला घरात पुन्हा यावं लागलं. याबद्दल बोलताना जरी आपल्याला बिग बॉसने विनंती केली, असं जरी गौहर म्हणत असली, तरी, प्रत्यक्ष कारण वेगळंच आहे. बिग बॉसचं घर स्वतःच्या मर्जीने सोडून गेल्यास स्पर्धकाला ५० लाख रुपये दंड भरावा लागेल, असा करार या घरात शिरण्यापूर्वी स्पर्धकांना करावा लागतो. यानुसार, गौहरवर ५० लाख रुपये नुकसान भरपाई करण्याची वेळ आली. त्यामुळे गौहरने आपला बाणेदारपणा गुंडाळून निमुटपणे पुन्हा बिग बॉसच्या घराचा रस्ता धरला.

ज्यावेळी कुशलला घर सोडण्याचे आदेश दिले होते, त्यावेळी गौहरही आपलं सामान भरू लागली. यावेळीच अपूर्व अगन्निहोत्रीने तिला या भरपाईची आठवण करून दिली होती. मात्र त्यावेळी संतापलेल्या गौहरने मला फरक पडत नाही असं किंचाळून सांगितलं होतं. मात्र जेव्हा खरंच दंडाची रक्कम भरण्याची वेळ आली, तेव्हा गौहरने पुन्हा ‘बिग बॉस’ची माफी मागत घरात प्रवेश केला.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, November 4, 2013, 15:21


comments powered by Disqus