`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`, Bigg Boss 7: Kamya hints at Gauahar, Kushal’s w

`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`

`गौहर-कुशालचं नातं किती दिवस चालेल, हे सांगणं कठिण`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘बिग बॉस’फेम छोट्या पडद्यावरील कलाकार काम्या पंजाबी या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडलीय. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर तीनं कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्या प्रेमावर शिक्कामोर्तब केलंय. दोघंही एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेत, असं काम्यानं म्हटलंय.

एका वेबसाईटला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना, दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेत, दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात पण हे सांगण कठिण आहे, की हे नातं किती दिवसांपर्यंत टिकू शकेल, असं काम्यानं म्हटलंय. त्यानंतर तीनं गौहर आणि कुशालच्या लग्नात सहभागी होण्याची इच्छाही बोलून दाखविली.

बिग बॉसच्या घरातील प्रेमाची परंपरा खूप जुनी आहे. पण, खूप कमी नाते इथून बाहेर पडल्यानंतरही टिकू शकले. याच परंपरेवर सध्या गौहर आणि कुशाल चालत आहेत. या अगोदरच्या सीझनमध्ये बीग बॉसच्या घरात सारा खान – अली मर्चंट, अश्मित पटेल – वीणा मलिक यांचं एकमेकांवर ऊतू गेलेलं प्रेमही लोकांनी पाहिलं होतं. परंतु, त्यांचं नातं काही जास्त काळ तग धरू शकलं नही. आता कुशाल आणि गौहर यांचं नातं या घरातून बाहेर पडल्यानंतरही टिकून राहतं किंवा नाही, हे तर काळच ठरवू शकेल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 16, 2013, 12:22


comments powered by Disqus