`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत, Comedy King Kapil Sharma, SRK Help

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भव्यसेट जळून खाक झाला आणि हा कार्यक्रम बंद पडणार का, याचीच चर्चा सुरू होती. मात्र, `कॉमेडी नाईट्स विथ कपील` हा विनोदी कार्यक्रम सुरू राहण्याची आशा आहे. आता कपिलला अभिनेता शाहरूख खान मदतीसाठी पुढे सरसावलाय.

ग्यानसम्राज्ञी लतादीदी, दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांनीही आधी मदतीची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आता शाहरूखची भर पडल्याने `कॉमेडी नाईट्स विथ कपील` या विनोदी कार्यक्रमाचा सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉमेडी किंग कपील शर्माच्या मदतील अवघे बॉलीवूड धावून आले आहे.

२५ सप्टेंबर बुधवारी कपिलच्या या कार्यक्रमाच्या सेटला आग लागून संपूर्ण सेट पूर्णपणे बेचिराख झाला. ही बातमी कळताच कपिलला शाहरूखने मोबाईलवरून संपर्क साधला आणि मदत करण्याचे आश्वासन दिले.

आगीच्या घटनेनंतर मला पाठिंबा म्हणून अनेकांचे फोन येत आहेत. संपूर्ण बॉलिवूड एका कुटुंबासारखे माझ्या पाठीशी उभे आहे. शाहरूख आणि रोहीत शेट्टी यांनी सांगितले, सांग किती दिवसांत सेट उभा करायचा आहे? अशा सकारात्मक विचारातून पाठिंबा दर्शविला आहे.

सेटचे एकूण २२ कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नसून शॉटसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीसांची तपासणी सूरू असल्याचेही कपिलने स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 14:09


comments powered by Disqus