मतभेद दूर... कपिल आणि सुनीलमधली `गुत्थी` सुटली!, `Comedy Nights with Kapil`: Kapil and `Gutthi` bury

मतभेद दूर... कपिल आणि सुनीलमधली `गुत्थी` सुटली!

मतभेद दूर... कपिल आणि सुनीलमधली `गुत्थी` सुटली!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

‘कॉमेडी नाईट विथ कपिल’चा प्रस्तूतकर्ता कपिल शर्मा आणि या कार्यक्रमातील एक माजी कलाकार ‘गुत्थी’ म्हणजेच सुनील ग्रोवर यांच्यातील मतभेद संपल्याची चिन्ह आहेत.

‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या कार्यक्रमादरम्यान या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला होता की सुनील ग्रोवरनं या कार्यक्रमाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर, सुनील ग्रोवर यानं दुसऱ्या एका प्रतिस्पर्धी चॅनलमध्ये जाऊन आपला कार्यक्रम सादर केला... लोकप्रिय झालेल्या ‘गुत्थी’चीच भूमिका सुनील दुसऱ्या चॅनलवरही सादर करणार असल्याच्याही बातम्या आल्या. परंतु, ही गोष्ट कपिल शर्मा आणि ‘कॉमेडी नाईट…’च्या निर्मात्यांना योग्य वाटली नाही आणि त्यांनी सुनीलला कायदेशीररित्या नोटीस धाडली. यामध्ये, ‘गुत्थी’ हे कॅरेक्टर एका चॅनलच्या कार्यक्रमातील कॉपीराईट असून कुणीही त्याला कॉपी करू शकत नाही, असं या नोटीशीत म्हटलं होतं.

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, सुनील ग्रोवरनं ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ ज्या वेळेत टीव्हीवर प्रसारीत केलं जातं त्याच वेळी आपला कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता मिळालेल्या बातमीनुसार, सुनीलनं असं काहीही न करण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या कार्यक्रमाशी स्पर्धा करून वातावरण बिघडवणं सुनीलला मान्य नाही.

सुनिलचा हा नवा कार्यक्रम कपिलच्या कार्यक्रमाला टक्कर देणारा असेल पण, तो ‘कॉमेड नाईट...’ पेक्षा वेगळ्या वेळी टीव्हीवर प्रसारीत होईल.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 15:36


comments powered by Disqus