Last Updated: Friday, November 15, 2013, 18:38
सध्या ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ शो मधून गुत्थी बाहेर जाणार की नाही? ही चर्चा जोरदार चालू आहे. या शोचा सुत्रधार कपिल शर्माने शोमधून गुत्थी बाहेर जाण्याबाबतचे मौन आता तोडले आहे. कपिलने आपल्या सहकलाकार सुनील ग्रोवरसाठी ट्विटरवर ट्विट केलं की, “मला सुनील आणि गुत्थीसाठी आपुलकी आहे. मी नेहमीच कार्यक्रमात त्यांचे स्वागत केले आहे. मी त्यांना फक्त शिफारस करू शकतो, परंतु मी त्यांना आग्रह करू शकत नाही. काही हो मला त्याच्यासाठी आपुलकी आणि आदर आहे. परंतु कृपया याबाबत अफवा पसरवू नये.