Last Updated: Saturday, December 8, 2012, 23:30
www.24taas.com, मुंबईटीव्ही रियालिटी शो `डान्स इंडिया डान्स` च्या निर्मात्यासह तीन जणांना दिल्ली पोलिसांनी १५० लोकांना ५० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केली आहे.
उत्तरप्रदेशातील संदीप आणि मनोज शुक्ला हे दोघे भाऊ आणि महाराष्ट्रातील ठाण्याचा रहिवासी सुरेंद्र बाठो या तिघांवर कॉल सेंटर सुरु करण्याच्या नावाखाली ५० कोटी रुपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप शुक्ला बद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो `लिओ 1` नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवतो. बॉलिवूडमध्ये त्याची चांगली ओळख आहे. नुकताच त्याने `डान्स इंडिया डान्स`च्या दुस-या पर्वाची निर्मीती केली होती. तसेच एका हास्य कलाकाराबरोबर चित्रपट निर्मीती क्षेत्रात उतरण्याचीही त्याची तयारी आहे.
First Published: Saturday, December 8, 2012, 23:05