डेल्नाझ इराणी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर…, delnaz irani out of big boss

डेल्नाझ इराणी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर…

डेल्नाझ इराणी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर…
www.24taas.com, मुंबई

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन ६’ आता शेवटच्या टप्प्यात पोहचलंय. त्यामुळे प्रत्येक क्षण काहीतरी नवीन आणि धक्कादायक या घरात घडत असतं. प्रेक्षकांना एक नवीन झटका बसेल जेव्हा ते या कार्यक्रमातून डेल्नाझ इराणीला घराबाहेर पडताना बघतील.

डेल्नाझ या कार्यक्रमाच्या विजेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार समजली जात होती. पण, मध्यरात्रीच्या सुमारास बिग बॉसच्या घरातून डेल्नाझला बाहेर पडण्याचे आदेश मिळालेत. मंगळवारी रात्री बिग बॉसनं या कार्यक्रमातील सगळ्या स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये एकत्र जमायला सांगितलं आणि उरलेल्या स्पर्धकांपैकी एकाला घराबाहेर काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.

यावेळी डेल्नाझ आणि तीचा एक्स पती राजीव पॉल यांना दोघांना स्टुलावर उभं राहायला सांगितलं गेलं. त्यानंतर डेल्नाझला सगळ्यात कमी मतं मिळाल्यामुळे तिला बाहेर घराबाहेर पडावं लागेल, असे आदेश बिग बॉसनं दिले. गेल्या ऑक्टोबर महिन्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून डेल्नाझ या घरातच होती.

आता बिग बॉसच्या घरात केवळ पाच स्पर्धक उरलेत. त्यामध्ये सना खान, राजीव पॉल, उर्वशी ढोलकिया, इमाम सिद्दीकी आणि निकेतन मधोक यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात जिंकणाऱ्या स्पर्धकाला ५० लाखांचं बक्षीस मिळणार आहे. या कार्यक्रमाचा शेवट शनिवारी होणार आहे.

First Published: Wednesday, January 9, 2013, 17:04


comments powered by Disqus