Last Updated: Saturday, January 12, 2013, 07:49
www.24taas.com, मुंबई विविध कारणांमुळे किंवा वादांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात पोहचलाय. नुकतीच डेल्नाझ इराणी या घरातून बाहेर पडली होती त्यानंतर लगेचच तिचा पूर्व पती राजीव पॉललाही या घराबाहेर पडावं लागलंय.
राजीव शनिवारी होणाऱ्या ग्रँड फिनालेच्या एक दिवस अगोदर घरातून बाहेर पडलाय. कार्यक्रमाचा होस्ट सलमान खाननं त्याच्या ‘एक्झिट’ची घोषणा केली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात झाल्यापासून राजीव या घरातील सदस्यांमध्ये सहभागी होता. १४ वर्षांच्या विवाहीत जिवनानंतर टीव्ही अॅक्टर राजीव आणि डेल्नाझ २०१० मध्ये वेगळे वेगळे राहू लागले. २०१२ मध्ये हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले. बीग बॉसच्या घरात इमाम सिद्दीकी सोडला तर त्याचे इतर सगळ्यांशी चांगले संबंध राहिले. मॉडेल सना खान आणि राजीव मैत्रीवर अनेक चर्चा आणि वादही झाले.
राजीव घराबाहेर पडल्यानंतर आता सना खान, इमाम, निकेतन मधोक आणि उर्वशी ढोलकिया फायनलमध्ये पोहचलेत. विजेत्याला ५० लाखांचं बक्षीस मिळणार आहे.
First Published: Saturday, January 12, 2013, 07:49