‘द गुत्थीज शो’ मधून झळकणार गुत्थी!Gutthi means Sunil Grover will starts his own show?

‘द गुत्थीज शो’ मधून झळकणार गुत्थी!

‘द गुत्थीज शो’ मधून झळकणार गुत्थी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कलर्स वाहीनीवरील ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम काही न् काही कारणांसाठी चर्चेत असतोच. मध्यंतरीच्या काळापासून कपिल-गुत्थी-गुत्थी-कपिल-सुनील-कपील हे प्रकरण चांगलंच रंगलं आहे. सर्वांना आतापर्यंत समजलं असेलच की गुत्थी अर्थातच सुनील ग्रोवरनं ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ शो सोडला आहे.

‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ शो सोडून गुत्थी आपला नवा शो लाँच करण्याची शक्यता आहे. अर्थातच गुत्थी आपला स्वत:चा वेगळा शो सुरू करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव ‘द गुत्थीज शो’. मिळलेल्या माहितीवरुन सुनील ग्रोवर या दिवसात आपल्या नव्या शोच्या तयारीत लागला आहे, परंतु चर्चा अशी पण आहे की, गुत्थी परदेशात कपिल सोबत शो करण्यात व्यस्त आहे. अद्याप या दोन्ही गोष्टींची पडताळणी झाली करण्यात येतेय.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मानं ट्विटद्वारे स्पष्ट केलं होतं की, ‘त्याच्या आणि गुत्थीमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे. गुत्थीला काही कारणांवरुन शोमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळं शोमध्ये परत येण्यासाठी मी गुत्थीवर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. परंतु जर गुत्थी अर्थातच सुनील त्याचा निर्णय बदलतो आणि शोमध्ये पुन्हा परत येतो. तर शोमध्ये त्याचं स्वागतच आहे’. विशेष म्हणजे गुत्थी अजूनही शोमध्ये दिसतोय.

कार्यक्रमाची लोकप्रियता बघून गुत्थीनं कलर्स वाहिनी आणि प्रॉडक्शन टीमकडून जास्त पॅकेज मागितलं होतं. परंतु टीमनं यासाठी नकार दिला. यानंतर गुत्थी शोमध्ये दिसली नाही. परंतु गुत्थीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, त्याला काही काळापासून शोमध्ये अडचणी येत होत्या. भविष्यात अजून अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी शो सोडणं त्यानं महत्त्वाचं समजलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 16:54


comments powered by Disqus