Last Updated: Sunday, September 22, 2013, 19:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई‘माझ्या मुलांनी देखील बिग बॉस मधील इतके आक्षपार्ह विषय बघावे असं मला वाटत नाही’, मुंबईच्या एका लोकप्रिय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने असं मत व्यक्त केलं.
शो दरम्यान स्पर्धकांच्या भानगडींमध्ये वाहत जाण्याबद्दल देखील सलमाननं नापसंती दर्शविली.
“बिग बॉसच्या घरातलं स्पर्धकांचं वागणं मला अजिबात रुचत नाही. घरामधील अबालवृद्ध हा कार्यक्रम पाहात असतात. जर मी पालक असतो, तर माझ्या मुलांना इतका आक्षपार्ह शो मी पाहू दिला नसता. एका घरात वास्तव्य असताना काही प्रसंगी स्पर्धकांमध्ये होणारे भांडणं मी समजू शकतो. परंतु फक्त प्रसिध्दीसाठी भानगडी आणि आंकांडतांडव केला जातो, याचं मी समर्थन करणार नाही.” असं सलमान खान म्हणाला.
बिग बॉस या शोची प्रसिध्दी ‘कौटुंबिक शो’ म्हणून जरी होत असली, तरी हा शो कधीच कौटुंबिक मनोरंजनाचा नव्हता. आता या शोच्या सूत्रसंचालकानेच ‘माझ्या मुलांनी देखील बिग बॉस मधील इतके आक्षपार्ह विषय बघावे असं मला वाटत नाही’ असं मत व्यक्त केल्यावर प्रेक्षकांनीही यावर विचार करण्याची वेळ आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 22, 2013, 19:45