Last Updated: Saturday, January 11, 2014, 16:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आपल्या एका ‘जोक’वर महाराष्ट्र महिला आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आलाय. यानंतर त्यानं पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमावर आणि जोक्सवर आपली भूमिका लोकांसमोर ठेवलीय.
‘आम आदमी पार्टी’चा कित्ता गिरवत आपल्या जोक्सवर जनतेची मत घेण्याचं आव्हानच त्यानं टीकाकारांसमोर ठेवलंय. ‘जनतेचा जो निर्णय असेल तोच अंतिम निर्णय असेल’ असं कपिलनं फेसबुकवर म्हटलंय.
कपिल शर्मा यानं गेल्या आठवड्यात ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कार्यक्रमात गरोदर महिलांवर एक विवादास्पद वक्तव्य केलं होतं. यावर महिला आयोगानं आक्षेप घेत कपिल शर्माला नोटीस धाडली होती.
यानंतर कपिलनं फेसबुकवर आपलं म्हणणं मांडलंय. ‘मी बातम्यांमध्ये पाहिलं... जर, माझ्या वक्तव्यानं कुणी दुखावलं गेलं असेल तर मला इतकंच म्हणायचंय की मी काही क्रिमिनल नाही. मला केवळ लोकांना हसवणं आवडतं.... मी कधीही कुणाच्या असहाय्यपणाला हास्यात उडवलेलं नाही. जर, मी काही चुकीचं म्हटलं असेल तर ते चुकीचंच असेल... तुम्ही जनतेचंच मत घ्या... जो काही जनतेचा निर्णय असेल तोच निर्णय अंतिम असेल... या सुंदर जगाला आणि भारताला देव आशिर्वाद देवो. हसणं आणि आनंदी राहण्यापेक्षा मोठं काही नाही’.
राज्य महिला आयोगाच्या नोटीसला १५ दिवसांच्या आत कपिलला उत्तर द्यायचंय. जर, या उत्तरानं आयोगाचं समाधान झालं नाही तर ते कोर्टात जाऊ शकतात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 11, 2014, 16:17