फ्रिडा-नर्गिसचा `हॉट टॉक`, करण थंड!, `Koffee with Karan` gets bold, to go on air late night

फ्रिडा-नर्गिसच्या `हॉट कॉफी`चा लेट नाईट शो!

फ्रिडा-नर्गिसच्या `हॉट कॉफी`चा लेट नाईट शो!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिनेनिर्माता करण जोहर होस्ट करत असलेला `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम आता जरा जास्तच बोल्ड झालेला दिसतोय. कारण, आपल्या `बोल्डनेस`मुळे या कार्यक्रमाला चक्क आपली वेळ बदलण्याची वेळ आलीय.

नेहमी प्राईम टाईममध्ये प्रसारित होणारा `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम या आठवड्यात मात्र लेट नाईट म्हणजे रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे... आणि याला कारण म्हणजे अभिनेत्री नर्गिस फाकरी आणि फ्रिडा पिंटो...

पहिल्यांदाच `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम इतका बोल्ड झालेला दिसतोय. या कार्यक्रमात फ्रिडा आणि नर्गिस आपल्या `बोल्डनेस`च्या सीमारेषेवर पोहचलेल्या दिसतायत. या एपिसोडचा कंटेट इतका `अडल्ट` आहे की तो प्राईम टाइमला दाखवला जाऊ शकत नाही, यामुळे चॅनलला कार्यक्रमाची वेळच बदलावी लागलीय.

दोन्ही अभिनेत्री या शोमध्ये अतिशय फ्रँक होत्या आणि सेक्स बद्दल विचारलेल्या प्रश्नांना अतिशय बोल्डनेसने उत्तर दिलं. इतकंच नाही तर दोघींनी आपल्या नावाचा अर्थ दुसऱ्याच `बोल्ड` भाषेत सांगितला.... जे ऐकून करण तर `थंड`च पडला...

पहिल्यांदा प्रसारित होण्यासाठी कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आलीय पण पुर्नप्रसारण मात्र वेळेनुसारच होणार आहे. मात्र, यो दोघींचं `बोल्ड टॉक` यामधून एडिट केलेलं असेल. हा कार्यक्रम येत्या रविवारी स्टार वर्ल्डवर रात्री ११ वाजता पहिल्यांदा प्रसारित होणार आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 10:20


comments powered by Disqus