माधुरी दीक्षित- अनिल कपूर आले एकत्र, Madhuri Dixit and Anil kapoor in Colors event

माधुरी दीक्षित- अनिल कपूर आले एकत्र

माधुरी दीक्षित- अनिल कपूर आले एकत्र
www.24taas.com, मुंबई

लाखो दिलो की धडकन असणारी माधुरी दीक्षित आणि एकेकाळचा चार्मिंग बॉय अनिल कपूर यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री फारच गाजली होती. आणि त्यामुळेच अनिल कपूर आणि माधुरी पुन्हा एकत्र दिसल्याने नव्याने चर्चेला उधाण आलं आहे.

`तेजाब`, `राम-लखन`, `बेटा` अशा चित्रपटांमधून झळकलेली लोकप्रिय जोडी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसले. "कलर्स` वाहिनीच्या गोल्डन पेटल ऍवॉर्ड सोहळ्यात अनिल आणि माधुरी यांनी एकत्र "परफॉर्मन्स` केला. ही जोडी इतक्‍या वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवरही आनंद झळकत होता.

याबाबत अनिल कपूर म्हणाला, "माझ्या आवडत्या सहकलाकारासोबत इतक्‍या वर्षांनी थिरकताना खूपच आनंद झाला. माधुरी केवळ उत्तम कलाकार नाही, तर खूप चांगली व्यक्ती आहे. ती माझी आवडती कलाकार आहे.`` माधुरी आणि अनिल २००१ मध्ये "लज्जा` या चित्रपटामध्ये दिसले होते. त्यानंतर ११ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले.

First Published: Wednesday, December 5, 2012, 11:28


comments powered by Disqus