Last Updated: Sunday, November 10, 2013, 16:29
www.24taas.com, वृत्तसंस्था, शिमलाटीव्ही रिअॅलिटी शो ‘बॅचलोरेट इंडियाः मेरे खयालों की मल्लिका’मध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतचं मन जिंकण्यात मॉडेल विजय सिंहला यश आलं. आता विजय आणि मल्लिका खरोखरच लग्न करणार असल्याची माहिती मिळतेय.
पुण्यात मनिष मल्होत्राच्या एका शोमध्ये भाग घेणार असलेल्या विजयनं सांगितलं की, आता पडद्यामागे मल्लिका आणि मी एकमेकांना समजून घेणार आहोत आणि नंतर विवाहबंधनात अडकणार. ते दोघंही पुढील आठवड्यात धर्मशाला इथं जाणार असल्याचंही विजयनं स्पष्ट केलंय.
धर्मशाला इथंच सुट्ट्यांदरम्यान लग्नाची बोलणी होईल. ‘आम्ही जीवनसाथी आहोत’ असं विजयनं त्यांच्या लग्नाविषयीच्या प्रश्नांना उत्तर देतांना म्हटलं. मल्लिका शूटिंगच्या निमित्तानं १० दिवसांसाठी लॉस एंजिलिसला जाणार आहे. ती परतल्यानंतर आम्ही सुट्टीसाठी जावू, असं विजयनं सांगितलं.
विजयची मोठी बहिण उषा या मात्र या लग्नाबाबत विशेष उत्सुक दिसल्या नाही, कारण विजय अजून तरुण आहे आणि त्याला आणखी यश कमवायचंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, November 10, 2013, 16:29