Last Updated: Sunday, September 1, 2013, 15:34
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई नव्यानं सुरु होणाऱ्या बिग बॉस सिझन-७ मध्ये सहभागी होण्याची ऑफर पूनम पांडेनं धुडकावून लावल्याची माहिती मिळतेय. पूनमला या शोसाठी दोन ते सव्वा दोन कोटींची ऑफर दिली. मात्र पूनमला तीन कोटी हवे आहेत. त्यामुळं तिनं ही ऑफर धुडकावल्याचं कळतंय.
आर्थिक गणित न जुळल्यानंच पूनमनं या प्रस्तावास केराची टोपली दाखविल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भारतानं विश्वककरंडक जिंकल्यास आपली वस्त्रे उतरविण्याची घोषणा केल्यानंतर पूनम प्रकाशझोतात आली होती. त्यानंतर ‘खतरों के खिलाडी- 4’ मध्येही ती दिसली होती. तर तिचा ‘नशा’ हा चित्रपट गेल्या जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.
आयोजकांच्या मते, बिग बॉसच्या मागील तीन सिझनसाठीही पूनम सोबत संपर्क केला होता. मात्र तेव्हाही पैशाच्या कारणावरुन तिनं ऑफर नाकारली होती. त्यामुळं आता बिग बॉसच्या घरात कोण-कोण दिसतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, September 1, 2013, 15:34