Last Updated: Thursday, November 8, 2012, 17:19
www.24taas.com, मुंबईयावेळी `बिग बॉस`च्या सीझनमध्ये सगळं शांत आणि कौटुंबिक पातळीवर चालू आहे, असं वाटत असतानाच `बिग बॉस`ने पुन्हा एकदा वादात पडायची तयारी केली आहे. गेल्या सीझनमध्ये भारतीय टीव्हीवर इंडो-कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिऑन आणून बिग बॉसने भारतीय प्रेक्षकांची अभिरूची खालच्या पातळीवर आणली होती. आता पुन्हा बिग बॉस नव्या पॉर्न स्टारला भारतीय प्रेक्षकांसमोर हजर करणार आहे.
टीआरपी वाढवण्यासाठी बिग बॉसमध्ये `प्रिया राय` नामक आणखी एका पॉर्न स्टारला भारतीय टीव्हीवर आमंत्रित केलं आहे. पाचव्या सीझननंतर सलमान खानने प्रेक्षकांना वचन दिलेलं, की बिग बॉसचा सहावा सीझन पूर्णपणे कौटुंबिक असेल. त्यासाठीच बिग बॉसची वेळ बदलून रात्री ९ ची करण्यात आली होती.
प्रिया राय ही भारतीय वंशाची अमेरिकन पॉर्न फिल्म स्टार आहे. प्रियाला प्रिया राय, अंजली राय तसंच प्रिया अंजली राय या नावांनी ओळखलं जातं. अश्लील सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी प्रिया राय १२ वर्षं सेक्सी डांसर म्हणून कार्यरत होती. त्यामुळे बिग बॉसद्वारे नव नव्या पॉर्न स्टार्सना भारतीय व्यसपीठ उपलब्ध करून देण्याची मोहिम तर उघडली नाही ना, असा प्रश्न पडला आहे. आता सनीनंतर भारतीय प्रेक्षक प्रियालाही स्वीकारणार का हा प्रश्न आहे.
First Published: Thursday, November 8, 2012, 16:46