राहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?, rahul dimpy mahajan headed for splitsville

राहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?

राहुल महाजन दुसऱ्यांदा घटस्फोटासाठी तयार?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्वर्गीय भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा चर्चेत आलाय... राहुल पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण आहे त्याची वैवाहिक जीवनातील घडामोडी... राहुल आपल्या पत्नीला - डिंपी गांगुली हिला लवकरच घटस्फोट देणार आहे, असं समजतंय.

या घटस्फोटामागचं कारण आहे... प्रेमाचं त्रिकोण. डिंपी सध्या राहुलसोडून दुसऱ्याच एका व्यक्तीसोबत प्रेमाची गाणी गात आहे, असं समजंतय. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर राहुलनं स्वत:च्याच रचलेल्या स्वयंवरात त्यानं डिंपी हिची निवड आपली पत्नी म्हणून केली होती. ६ मार्च २०१० रोजी दोघं एका रिअॅलिटी शो दरम्यान विवाह बंधनात अडकले होते.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, डिंपीचं सूत सध्या दुबईमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी जुळलंय. या व्यक्तीची दुबईमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचंही समजतंय. राहुलशी लग्न करण्याअगोदरपासूनच डिंपी या व्यक्तीला ओळखत असल्याचं म्हटलं जातंय. राहुललाही या दोघांच्या अफेअरबद्दल माहित होतं.

राहुल आणि डिंपी गेल्या वर्षीपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. आता तर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या सहा महिन्यांपासून डिंपी दुबईत आहे.

लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलनं आपल्याला मारहाण केल्याची तक्रार डिंपीनं केली होती. परंतु, त्यानंतर सगळं काही आलबेल असल्याचं सांगितलं गेलं. गेल्या वर्षी राहुल आणि डिंपी एका डान्स शोदरम्यान एकत्र सहभागी होताना दिसले होते. परंतु, त्याचं या दोघांना काहीही महत्त्व नव्हतं. त्यामुळेच राहुल आणि डिंपीचा लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. राहुल केवळ लोकसभा निवडणुका संपुष्टात येण्याची वाट पाहत आहे. कारण, राहुलची बहिण पुनम महाजन सध्या लोकसभा निवडणूक लढवत आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 17:04


comments powered by Disqus