‘बिग बॉस-८’मधून रणबीर करणार सलमानला बाहेर?Ranbir Kapoor to replace Salman Khan as ‘Bigg Boss 8’ host

‘बिग बॉस-८’मधून रणबीर करणार सलमानला बाहेर?

‘बिग बॉस-८’मधून रणबीर करणार सलमानला बाहेर?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक विशेष बातमी आहे... सलमान खाननं बिग बॉस ८चं होस्टिंग करणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर आता नव्या नावाचा शोध वाहिनीनं सुरु केलाय. यासाठी अभिनेता रणबीर कपूर याला बिग बॉस-८चं होस्टिंग करण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचं कळतंय.

टीव्हीवरील प्रसिद्ध असलेला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं मागील चार सिझनपासून अभिनेता सलमान खान होस्टिंग करतो. टीआरपी रेटिंगमध्ये सलमाननं या शोला अव्वल स्थानावर पोहोचवलं आहे.

मात्र आता सलमान खान आपल्या आगामी सामाजिक विषयावरील टीव्ही शोच्या शूटमध्ये बिझी आहे. त्यामुळं त्याला आगामी ‘बिग बॉस’ सिझन ८चं होस्टिंग करायला मिळणार नाहीय.

जर रणबीर कपूर वाहिनीचं हे प्रपोजल स्वीकारेल तर तो रणबीरचा पहिला टीव्ही शो असेल. त्यामुळं रणबीर कपूरच्या आणि बिग बॉसच्या फॅन्सना आता रणबीरला नव्या रुपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बघूया काय होतंय भविष्यात?


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 15, 2014, 11:46


comments powered by Disqus