यंदाचं `बीग बॉस` शाहरुख होस्ट करणार?, shah rukh khan to host bigg boss 8

यंदाचं `बीग बॉस` शाहरुख होस्ट करणार?

यंदाचं `बीग बॉस` शाहरुख होस्ट करणार?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बीग बॉसच्या आठव्या पर्वाची जोरदार हवा आत्तापासूनच सुरू झालीय... आत्ता-आत्तापर्यंत यंदा हा शो सलमान खान नाही तर अभिनेता अजय देवगण करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता मात्र हा रिअॅलिटी शो शाहरुख खान होस्ट करणार असल्याचं म्हटलं जातंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या कलर्स वाहिनीच्या दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टीसाठी सलमान अनुपस्थित राहिला होता. सलमानच्या गैरहजेरीत शाहरुख मात्र या पार्टीत दिसला. याचमुळे कदाचित शाहरुख खान बीग बॉसचा आठवा सीझन होस्ट करणार असल्याच्या शक्यतेला जोरदार हवा मिळालीय.

सलमानचं पार्टीत नसणं चॅनलनं खूप गंभीरतेनं घेतलंय, असंही म्हटलं जातंय. सीझन ७ दरम्यान अनेकदा सलमाननं स्वत:च आपण हा शो पुढच्या वेळेस होस्ट करणार नाही, असं अनेकदा म्हटलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 18:03


comments powered by Disqus