'पुढचं पाऊल'मध्ये आक्का वि. महिपत ! - Marathi News 24taas.com

'पुढचं पाऊल'मध्ये आक्का वि. महिपत !


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
पुढचं पाऊल ही मालिकाही सध्या रंजक वळणावर आलीय.  महिपतच्या येण्याने सरदेशमुखांच्या घरात वादळ आलंय, आणि या वादळाने साऱ्यांनाच पुरतं हैराण करुन सोडलंय.
 
महिपतने सरदेशमुखांच्या घरात एन्ट्री  केल्याने आक्कासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकलीय. महिपतच्या येण्याने सरदेशमुखांच्या घरातलं वातावरणंच बिघडलंय आणि त्याचा परीणाम म्हणजे जयवंत मानसिकरित्या पूर्ण खचलाय. तर इकडे महिपत मात्र, सरदेशमुखांच्या घरातली आपली जागा परत मिळवण्यासाठी सरसावलाय. त्यामुळे, आता आक्का आणि महिपतच्या या लढाईत कोण बाजी मारणार? जानकीच्या मृत्यूचा राज घरच्यांना समजणार का? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

First Published: Friday, December 2, 2011, 10:55


comments powered by Disqus