Last Updated: Friday, June 15, 2012, 23:48
www.24taas.com 
एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अबीरमुळे राधाची चिडचिड होते आहे तर घनाची अस्वस्थता वाढत चालले आहे. त्यामुळे राधा-घनामधील दुरावा वाढत चालला आहे. राधा आणि घना यांच्यात काय घडलंय काय बिघडलं आहे?
प्राची आत्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे घरी सगळे काळजीत पडले आहेत. आणि अबीरने सगळी सूत्र हातात घेतल्यामुळे राधाची चिडचिड होते आहे. काही का असेना...पण अबीरमुळे प्राची आत्याला बरं वाटायला लागलं त्यामुळे राधा अबीरची माफी मागते.
अबीरने राधासमोर मैत्रीसाठी हात पुढे केला खरा तोच तिथे घना येतो आणि समोरचं दृश्य पाहून पुन्हा अस्वस्थ होतो. राधा-घनाच्या आयुष्यात आता पुढे काय होणार याची उत्सुकता साऱ्यांनाच.
First Published: Friday, June 15, 2012, 23:48