'सलमान'ला आमीरचा 'अभिमान', काय म्हणतो 'खान' - Marathi News 24taas.com

'सलमान'ला आमीरचा 'अभिमान', काय म्हणतो 'खान'

www.24taas.com, मुंबई
 
अभिनेता सलमान आणि आमिर खान यांचं नातं इतकं चागलं नाहीये. आजवर त्या दोघांनी फक्त एकच सिनेमामध्ये काम केलं आहे. दोघं एकमेकांबाबत बोलण्यासही का - कू करीत असतात. पण यावेळेस मात्र सलमान खानने आमीरच्या बाबतीत मनमोकळेपणाने कौतुक केलं आहे. आणि हे कौतूक तोंडदेखलं अजिबात नव्हतं.
 
तर ते कौतुक होतं ते म्हणजे आमिरच्या कामाला सलमानने दिलेली पोचपावतीच आहे.   सलमान आपल्या एनजीओ (संस्थेसोबत) दुबईमध्ये आहे. सलमान आमीरच्या छोट्या पडद्यावरील सत्यमेव जयते का कार्यक्रमावर भलताच खूश झाला आहे. आणि त्यामुळेच त्यांने आमिरवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
 
सलमानने म्हटलं की, मला आमीरचा मला गर्व वाटतो. तो आपल्या कार्यक्रमात सत्यमेव जयते मध्ये खूप चागलं काम करतो आहे. सलमानला या शोमधील सातवा भाग खूपच आवडला की, तो ट्विट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. यार आमीर (टिल्लू) तू तर कमालच केलीस. तू काय काम करतोयस  यार असं म्हणतं त्याने आमीरचं कौतुक केलं आहे.
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, June 19, 2012, 13:33


comments powered by Disqus