'पिंजरा' मध्ये वाजणार लग्नाची शहनाई - Marathi News 24taas.com

'पिंजरा' मध्ये वाजणार लग्नाची शहनाई

झी २४ तास वेब टीम
 
आता लग्न म्हटलं की नटणं-मुरडणं आलंच.. अहो लग्न आहे ते म्हणजे 'पिंजरा' मालिकेत. वीर आणि आनंदीप्रमाणेच शेलार आणि देशमुख कुटुंबातले सारेच जण नटून-थटून वावरताना दिसत आहेत. आनंद असला तरी काहींना मात्र, दु:ख झाल्याचं त्यांच्या वेशभूषेतूनही कळुन येतं. काय म्हणता नाही कळलं.

 
आनंदी-वीरच्या लग्नासाठी देशमुख आणि शेलार कुटुंबातल्या सगळ्या पुरुष मंडळींचा ड्रेसकोड होत शेरवानी. मात्र, त्यातही ट्विस्ट आहेच, कारण, इथे कबीर चक्क काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसणार आहे. तर खोटं खोटं का होईना पण चेहऱ्यावर आनंद दाखवणारी आक्का आपल्या मुलीच्या लग्नात फारशी नटलेली दिसत नाही.
 
नारायणीने मात्र, आपल्या बहिणीसाठी थोडंस नटण्याचं ठरवलेलं दिसतं तर इकडे सून पसंत नसतानाही सासूबाई मात्र, अगदी थाटामाटात वावरणार आहेत एकूणंच काय तर आसु आणि हासूच्या खेळात देशमुख-शेलार कुटुंबातला हा लग्नसोहळा दिमाखात पार पडला

 

First Published: Wednesday, December 14, 2011, 12:47


comments powered by Disqus