महक बिग बॉसमध्ये परत - Marathi News 24taas.com

महक बिग बॉसमध्ये परत

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
या आठवड्याच्या अखेरीस महक चहल बिग बॉसच्या घरात दाखल होणार हे नक्की झालं आहे. महकला रिअल्टी शोमधून दोन आठवड्या पूर्वी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या महकला बिग बॉसमध्ये  वाईल्ड कार्ड एण्ट्री देण्यात आली आहे. शोनाली नागराणी आणि लक्ष्मी नारायण या इतर दोघी स्पर्धकांची नावंही वाईल्ड कार्ड एण्ट्रीसाठी चर्चेत होती. महकने कमबॅक केल्याचं चॅनलनं ऑफिशियल ट्विटर पेजवर जाहीर केलं आहे.
 
शोचा होस्ट सलमान खान याची महक फेव्हरिट असल्याची चर्चा सुरवाती पासूनच होती. बिग बॉसमधून बाहेर गेलेल्या पूजा मिश्रा आणि पूजा बेदी यांनी सलमान महकला झुकतं माप देत असल्याचं आरोप केला होता. सलमानने सिद्धार्थ भारद्वाजला महकशी गैरवर्तन केल्याबद्दल ताकीद सुध्दा दिली होती.
 
महकच्या रीएण्ट्रीमुळे आता आकाशदीप सहगल आणि तिच्यात असलेल्या संघर्षाला तोंड फूटेल अशी चिन्हं आहेत. येत्या काही दिवसात बिग बॉसमध्ये आकाशदीप उर्फ स्काय आणि महक यांच्यातील खडाजंगीने रंगत चढेल अशी चिन्हं आहेत.
 

First Published: Friday, December 23, 2011, 18:19


comments powered by Disqus