Last Updated: Friday, October 21, 2011, 14:18
झी २४ तास वेब टीम, मुंबईबालमजूर हा सामाजिक विषय घेऊन एनडीटीव्ही इमॅजिनने 'हार जीत' ही मालिका सुरु केली. सध्याचं लहान मुलांचं स्पर्धेचं युग या मालिकेत कथेच्या रुपात मांडलंय. पण, ज्यात ड्रामा, ट्विस्ट, मसालेदार गोष्टी येणार नाहीत तर तो डेली सोप नाहीच.. त्यामुळे मालिकेत सॉलिड चढउतार चालू आहेत.
सध्या 'हार जीत' मालिकेची जोरदार चर्चा आहे. माहीका सध्या मुंबईत इशिताच्या घरी राहतेय. पण, इशिताच्या आईला ते अजिबात पसंत नाही आहे. माहीकाच्या छोट्या छोट्या गोष्टींतून ती चिडते. त्यांच्या घरात झालेल्या एका पार्टीत माहीका एक डान्स परफॉर्मन्स देते. आणि सगळ्यांकडून वाहवा मिळवते.
एकदा ती इशितासोबत तिच्या शुटिंग सेटवर जाते. आणि तिथे काय काय मजा होते तसंच इशिताच्या आईविरुद्ध कोणत्या गोष्टी घडतात, हे बघण्यासाठी 'हार जीत'चे पुढच्या आठवड्यातले एपिसोड बघायला विसरु नका.
First Published: Friday, October 21, 2011, 14:18