Last Updated: Wednesday, February 29, 2012, 12:27
www.24taas.com, मुंबई सोनी टीव्हीवरील कुछ तो लोग कहेंगे ही मालिका आणि यातील मोहनीश बहल आणि कृतिका कामरा यांची जोडी खूप गाजत आहे. पण, मोहनीश बहल लवकरच या मालिकेला निरोप देणार आहेत.
डेली सोपच्या त्रासदायक शेड्युल्समुळे मोहनिश बहल यांची तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना आरामाची गरज असल्याचं सांगितलं आहे, तसंच डेली सोपच्या दिवस रात्रींचं कुठलंही वेळापत्रकच नसलेल्या डेली सोपमध्ये काम न करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. याच कारणामुळे मोहनीश बहल यांनी कुछ तो लोग कहेंगे या डेली सोप ला निरोप द्यायचा निरणय घेतला आहे.
सोनी चॅनलच्या सिनीयर एक्झेक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट तसेच बिझनेस हेड असणाऱ्या स्नेहा राजानी यांनी ट्विटरवर या घटनेला दुजोरा दिला आहे. “प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारणामुळे मोहनीश बहल कुछ तो लोग कहेंगे ही मालिका सोजत आहेत, ही गोष्ट खरी आहे. वेळी अवेळी काम न करण्याचा त्यांच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मोहनीश बहल कुछ तो लोग कहेंगे ही मालिका सोडून देत आहेत. बहल यांची तब्येत आणखी बिघडण्याआधीच त्यांना विश्रांती मिळावी यासाठी चॅनेल आणि बहल यांच्या सांमजस्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे.”
कुछ तो लोग कहेंगे ही मालिका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. ही मालिका ८०च्या दशकातील प्रसिद्ध पाकिस्तानी टीव्ही सिरीयल ‘धूप किनारे’ या मालिकेवरून घेण्यात आली आहे. मोहनीश बहल या मालिकेत डॉ. आशुतोष ही भूमिका साकारत आहेत तर कृतिका कामरा ही त्यांचा ‘लव्ह इंटरेस्ट’ असणाऱ्या ‘डॉ. निधी’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.
डॉ. आशुतोष यांचं अपघाती निधन दाखवून मोहनीश बहल यांना निरोप देण्यात येणार आहे. हा सीन यापूर्वीच शूट करून झालेला आहे. कुसुम मालिकेतील अभय कपूरची भूमिका कारणारे अनुज सक्सेना मोहनीश बहल यांची भूमिका करतील.
First Published: Wednesday, February 29, 2012, 12:27