Last Updated: Thursday, March 29, 2012, 13:01
www.24taas.com 
झी मराठीवरील 'उंच माझा झोका' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यमूचा अभिनय ही ह्या मालिकेतील सर्वात जमेची बाजू आहे. आणि त्यामुळेच या मालिकेत आता नवीन टि्वस्ट येतोय.
उंच माझा झोका या मालिकेत यमूच्या लग्नात नवरदेव खुद्द गायब होतात. त्यामुळे सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं. यमूच्या लग्नाची गोष्ट ही फारच वेगळी आहे. अखेर यमूच्या लग्नाची घटिका जवळ येते पण नवरदेव मात्र गायब असतात. नवरदेव मांडवात नसल्याने साऱ्यांनाच भीती वाटते.
पण हे कळताच वधूपित्याला घेरी येते. गोविंदरावांची मानदेखील शरमेनं खाली जाते. यमूला मात्र नवरदेव पळाला याची चिंताच नसते. आईला भेटायला मिळणार म्हणून यमू खूश होते. पण अखेर माधवराव लग्नमंडपात येतात आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडतो.
शुभमंगल सावधान म्हणत रानडे-कुर्लेकर शुभविवाह थाटात पार पडतो. पण तोच येतं एक वेगळं वळण. माधवरावांचा निषेध असो अशा घोषणा कानावर पडतात. यमूचा विवाह माधवरावांशी झाला खरा पण तोच येऊ घातलेलं हे नवं संकट. यातून यमू कशी सुटते हेच पाहायचं आहे.
First Published: Thursday, March 29, 2012, 13:01