Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:00
www.24taas.com 
'उंच माझा झोका' या मालिकेत सध्या आनंदाचे क्षण आहेत. नुकतंच लग्न झालेली रमा सासरी अर्थातच रानड्यांच्या वाड्यात रुळण्याचा प्रयत्न करते आहे.. सध्या काय सुरु आहे रानड्यांच्या वाड्यात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच.
रमाने केलेलं निरुपण आवडल्याने महादेव रानड्यांनी रमाला एक अनोखी भेट दिली आहे. रमाचं वय, तिचा अवखळपणा ध्यानात ठेऊनच महादेव रमाला बाहुली भेट देतात. रमासुद्धा महादेवाने दिलेली बाहुली पाहून थक्क होते.
तर दुसरीकडे, रमाचा हा पोरकटपणा, सासरी बेजबाबदारपणे वागणं पाहून ताईकाकू मात्र, रमावर चांगल्याच भडकतात. त्यामुळे आता ताईकाकूंच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी रमाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे नक्की.
First Published: Thursday, April 5, 2012, 16:00