'पुढचं पाऊल'मध्ये चाललयं तरी काय? - Marathi News 24taas.com

'पुढचं पाऊल'मध्ये चाललयं तरी काय?

www.24taas.com
 
पुढचं पाऊल ही मालिका सध्या एका वेगळ्याच ट्रॅकवर आली आहे. कारण आता सरदेशमुख कुटुंबाची सगळी सूत्र कांचनमालाच्या हाती आली आहेत. त्यामुळे मालिका निर्णायक वळणावर आली आहे. सरदेशमुख कुटुंबाची सूत्र कांचनमालाच्या हातात आल्याने त्याचा पुरेपुर फायदा कांचनमाला उठवते.
 
कल्याणी, आक्कासाहेब, इतकंच कशाला तर घरातल्या एकाचाही अपमान करण्याची संधी ती सोडत नाही. कल्याणीचा पुरेपूर छळ कांचनमाला करते आहे. आणि हे सगळं नुसतंच पहात राहतील तर त्या आक्कासाहेब कसल्या. कांचनमालाला जशास तसे उत्तर देण्याचा आक्कासाहेब प्रयत्न करत आहेत.
 
मात्र, सध्या सगळीच सूत्र कांचनमालाच्या हाती आहेत त्यामुळे आक्कासाहेबांचा प्रत्येक वार कांचनमाला परतवून लावते आहे. एकूणंच मालिकेत अचानक घडलेलं हे नाट्य पुढे काय वळण घेणार हे सूज्ञ प्रेक्षकांना सांगण्याची काहीच गरज नाही. मात्र, तोपर्यंत तरी आपण मालिकेतला हा नवीन ट्रॅक एन्जॉय करा.
 
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 17:42


comments powered by Disqus