Last Updated: Sunday, November 27, 2011, 17:23
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली 
सनी लियोन जेव्हापासून बिग बॉसमध्ये आली आहे तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. अडल्ट सिनेमात काम करणारी सुपर पॉर्न स्टारचा बाबत आता नवा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये सनी लियोनची सध्या फारच चर्चा सुरू आहे. जेव्हा पासून बिग बॉस सीजन-5 मध्ये सनी आली आहे. तेव्हापासून गूगलवर त्यांना सर्च करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
त्या आकड्यावर नजर टाकल्यास गूगल ट्रेंडस कडून असे समजते की उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात जास्तीत जास्त सर्च केले आहे. गूगल सर्च मध्ये सगळ्यात सनी लियोनला सर्च करणारे नोएडात जास्त आहेत. गुगल वर लियोनला पाहण्यात ओरिसा दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे. एवढंच नव्हे तर लुधियाना आणि भोपाळमध्ये सुद्धा अनेकजण लियोनला सर्च करण्यात पुढे आहेत.
16 नोव्हेंबर पूर्वी गूगल ट्रेंडस मध्ये सनी लियोन ही कुठेच आढळून येत नव्हती. पण बिग बॉसमध्ये आल्यापासून इंटरनेट सर्फिंग मध्ये अत्यंत आवडीने तिच्याबद्दल वाचंल आणि पाहिलं जातं, अनेक जण तिचे वॉल पेपर डाऊनलोड करत आहेत. आणि अडल्ट सिनेमांचे व्हिडोओ सुद्धा पाहत आहेत.
First Published: Sunday, November 27, 2011, 17:23